पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली पुनावळे ते भोंडवे कॉर्नर या भागात नवीन फुटपाथ बनविण्याचे काम करण्यात आले आहे. या कामात ठेकेदाराने फुटपाथचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवासेना, चिंचवड विधानसभा युवा उपअधिकारी सागर एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

सागर शिंदे यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली पुनावळे ते भोंडवे कॉर्नर रावेत या भागात नवीन फुटपाथ बनविण्याचे काम करण्यात आले आहे. या कामात ठेकेदाराने फुटपाथचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. ठिकठिकाणी नवीन बनवलेले फुटपाथ आताच उखाडले असून, जे ब्लॉक बसवले आहेत तेही सरळ व निट बसवले गेले नाहीत.
संबंधित कामाच्या ठिकाणी पाहणी केल्यास या कामाचा निकृष्ट दर्जा दिसून येईल. तरी सदर कामाची चौकशी करून ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच या कामाचे बिल अदा करू नये अशी मागणी सागर शिंदे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group