पिंपरी (Pclive7.com):- किरकोळ वादातून चौघांनी एका तरुणाच्या घरात जाऊन घरातील वस्तूंची तोडफोड करत तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (१ जून) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास थेरगाव येथे घडली.

सागर संजय टोंगळे (२४, थेरगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन गायकवाड (१९, थेरगाव) आणि अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर आणि त्यांची आई घरात असताना आरोपी घरात जबरदस्तीने आले. त्यांनी घरातील लॅपटॉप आणि टीव्ही कोयत्याने फोडला. सागर यांना शिवीगाळ केली. आरोपींना अडवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी सागर यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले.























Join Our Whatsapp Group