पिंपरी (Pclive7.com):- श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त होणा-या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी येत्या रविवारी (दि.३) साईभक्तांच्या मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आळंदी रोडवरील वडमुखवाडी येथील साई मंदिरात हा मेळावा होणार आहे, अशी माहिती श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी दिली आहे.
श्री साईबाबा प्रतिष्ठानच्या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त दस-याच्या मुहूर्तावर ११ ते १९ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत सलग ९ दिवस जागतिक स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम वडमुखवाडी येथील साई मंदिरात होणार आहेत. या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी आणि इतर नियोजन करण्यासाठी सर्व साईभक्तांच्या सुचनांची आवश्यकता आहे.
त्यासाठी साईभक्तांचा हा मेळावा येत्या रविवारी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. विखुरलेल्या सर्व साईभक्तांना एकत्रित आणण्याचाही एक प्रयत्न या मेळाव्यातून करण्यात येत आहे. तरी सर्व साईभक्तांनी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलंगे, शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त दास इनामदार आणि वसंत पिंपळे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group