पिंपरी (Pclive7.com):- शिवशाही व्यापारी संघटनेची महाराष्ट्र कार्यकारिणी आज (मंगळवार दि.२९) जाहीर करण्यात आली. यावेळी संघटनेचे प्रदेश सचिव गणेश आहेर उपस्थित होते.
पिंपरी येथील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात आयोजित कऱण्यात आलेल्या शिवशाही व्यापारी संघाच्यावतीने पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले, चिंचवड विधानसभा अध्यक्ष निलेश भोरे, खजिनदार माऊली जाधव, रोहिदास तांबे, शिवशाही व्यापारी संघाचे विभागप्रमुख प्रदीप दळवी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शिवशाही संघटनेचे उपाध्यक्ष गणेश पाडुळे महिला आघाडीच्या सारिका तामचीकर आदी उपस्थित होते.
शिवशाही व्यापारी संघाच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे – माधव काळे (लातुर जिल्हाध्यक्ष), विजय पिंगळे (नाशिक जिल्हाध्यक्ष), दिपक बिजेकर (दिंडोरी तालुकाध्यक्ष), पुणे शहराध्यक्ष (गोगा सुपेकर), सुनीता मोरे (पुणे महिला शहराध्यक्ष), सागर बाविस्कर (पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष), गणेश पाडोळे (पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष), बाळासाहेब गायकवाड (पिंपरी विधानसभा अध्यक्ष), सतीश भवाल (पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष), राज गिरी (चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष), भीमराव कुलकर्णी (खराळवाडी विभाग अध्यक्ष), कर्जत तालुकाध्यक्ष (सुहास ठाकरे), रंजत यादव (घाटकोपर विभागाध्यक्ष), प्रफुल्ल भोसले (उल्हासनगर विभागाध्यक्ष), बलराम जाधवानी (उल्हासनगर विभागाध्यक्ष), प्रकाश जैन (ठाणे जिल्हाध्यक्ष), बबलू वाणी (संभाजीनगर पूर्व शहराध्यक्ष), नितीन देशमुख (संभाजीनगर पूर्व उपाध्यक्ष), सागर बनसोडे (संभाजीनगर मध्य शहराध्यक्ष), साजिद कुरेशी, मुश्ताक कुरेशी (संभाजीनगर मध्य उपाध्यक्ष). सय्यद सलाबउद्दीन (संभाजीनगर मध्य शहर सचिव).