पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला आज सकाळी झालेल्या दमदार पावसाने झोडपून काढले आहे. काही मिनिटेच झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शहराला लागूनच असलेल्या आयटी पार्क हिंजवडी हा वॉटर पार्क हिंजवडी झाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

फक्त काही मिनिटे आलेल्या दमदार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक रस्ते, हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्याने तुंबले होते. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुचाकी वाहन देखील वाहून गेल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्याने आज आयटी पार्क हिंजवडी वाटर पार्क हिंजवडी झाल्याची वेळ ओढवली आहे.

दरम्यान भोसरी येथील शांतीनगर ते इंद्रायणी कॉर्नर रस्ता, भोसरी एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. आज सकाळी काही मिनिटांसाठी झालेल्या पावसाने प्रशासनाने केलेल्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. पावसाळा नियोजनाच्या नावाखाली बैठकांचा केवळ फार्स केला असल्याचं बोललं जात आहे.























Join Our Whatsapp Group