दिनेश यादव यांचा पुढाकार ; मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
पिंपरी (Pclive7.com):- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गायी – म्हशींना लम्पी या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. रोग झाल्यावर तात्काळ निदान करण्यासाठी आवश्यक सोयी सुविधा प्रदान करण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या असून तो रोग होऊच नये यासाठी जनजागृती आणि लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याचे माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी सांगितले. पशुधनाला लंपे आजारापासून दूर ठेवून त्यांचे संरक्षण करण्यासाठी मोफत लसीकरण मोहिमेचा प्रारंभ केला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जनावरांमधील लंपी या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी चिखली, कुदळवाडी ,बालघरेवस्ती, येथे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व दिनेश यादव यांच्या सहकार्याने वेगाने लसीकरण सुरु करण्यात आली आहे. यानिमित्ताने जनावरांची पाहणी करून त्यांना लसीकरण करण्यात आले.

याबाबत दिनेश यादव म्हणाले पशुधनाची पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे चिखली, कुदळवाडी ,बालघरेवस्ती येथे
लसीकरण मोहीम योग्य पध्दतीने राबवली.
शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी आणि लम्पीची लक्षणे दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

पशुधनाच्या सरंक्षणासाठी महापालिकेचा पुढाकार!
लम्पीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने जनावरांना उपचार व लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. तरी सर्व पशुपालकांनी पशुवैद्यकीय अधिकार्यांशी संपर्क साधून आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्या.जनावरांमध्ये पसरणारा लम्पी हा रोग संसर्गजन्य आहे. त्यामुळे रोग आल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आणि रोग आला तर त्याचा प्रसार होऊ नये याकरिता आवश्यक काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे.
– अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका.
