

पिंपरी पिंपरी शहराचा कायापालट करण्यात अनेकांचे योगदान आहे. आता दिव्यांग भवन कोणी उभारले. याची तारीख आयुक्तांनी सांगायला हवी होती. २०१७ ला महापालिकेत भाजपची सत्ता आली, त्यानंतर हे दिव्यांग भवन यासंह अनेक विकास कामे झालीत. त्यामुळं या शहराच्या विकासात आमचं ही योगदान आहे. इतरांचे योगदान आम्ही नाकारत नाहीच. मात्र, बऱ्याच जणांचे योगदान आम्ही नाकारत नाही. शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलं नसतं तर काय केलं असतं? घंटा….. म्हणजे देवळात जाऊन घंटा वाजवत बसले असते का? आता गेली ३० वर्षे काय केलं असं जे जे येऊन सांगतायत, ते आम्ही कुठं नाकारत आहोत. तुम्ही केलं की पण आम्ही पण २०१७ पासून विकास केलेला आहेच ना? हे कसं काय नाकारता, असे महेश लांडगे यांनी म्हटले.
आम्ही केलं की भ्रष्टाचार आणि त्यांनी केलं की कामं. आम्ही इथं पारदर्शक काम करत आहोत. खासदार आप्पा बरोबर आहे का? जे चांगलं ते चांगलं, मी कोणाला घाबरत नाही. पैलवान आहे, सर्वांना अंगावर घ्यायची सवय आहे. स्पष्ट सांगताना माझा पाऊल डगमगणार नाही. देवेंद्रभाऊ करुन जातो आम्ही, नाव दुसऱ्याचं लागतं. जरा माझं पण नाव कुठं तरी लिहावं. आयुक्तांना प्रोटोकॉल मध्ये बदल करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.






















Join Our Whatsapp Group