पिंपरी (Pclive7.com):- वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात होर्डिंग अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील पुनावळे येथील ही घटना आहे. पुनावळे येथे सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. कांताबाई विश्वनाथ भारती (वय ५५ रा.चिखली) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कांताबाई भारती या पुनावळे येथील बांधकाम साईटवर काम करत होत्या. कामावरून सुटल्यावर पाऊस सुरू झाल्याने सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये त्या थांबल्या होत्या. मात्र जोरात वारा सुरू झाल्याने केबिनवर शेजारी असलेले होर्डिंग कोसळले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
काल पहाटेपासून शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी अखेर पावसाने हजेरी लावली. काही वेळातच वादळी वाऱ्यासर पाऊसही झाला. या वाऱ्याच्या वेगासह आलेल्या या पावसाने एकाचा जीव घेतला. तसेच शहरात अनेक ठिकाणी झाडं पडल्याने वाहनांचंही नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्यात.





















Join Our Whatsapp Group