चिखली (Pclive7.com):- कुदळवाडी यादवनगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी हनुमान मंदिर येथे आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी उपवास फराळ वाटप कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि सेवाभावी वातावरणात पार पडला.

स्व. वै. वामन महाराज यादव, कै. नथु खंडु यादव, कै. बबाबाई नथु यादव, कै. सुदाम नथु यादव, कै. गुलाब नथु यादव यांच्या पुण्यस्मरणार्थ या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री. दिनेश यादव आणि सौ निशा यादव यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. हा उपक्रम आमदार पै. महेशदादा लांडगे युवा मंच, इंद्रायणी महिला प्रतिष्ठान आणि दिनेश लालचंद यादव मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आलेल्या भाविकांनी पंढरपूरची वारी मंदिरातच अनुभवली. जे भाविक प्रत्यक्ष पंढरपूर वारीस जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी या मंदिरातच विठ्ठलनामाच्या गजरात, एकात्मतेच्या भावनेत हा कार्यक्रम पार पडला. विठ्ठलाची प्रार्थना, भक्तिमय वातावरण, आणि फराळ वाटप यामुळे पंढरपूरचीच अनुभूती लाभली. या प्रसंगी सर्वच वयोगटांतील उपवास करणाऱ्या महिला, पुरुष व बालकांसाठी स्वादिष्ट फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थितामध्ये लालचंद यादव, विजयराज यादव, दत्तात्रय हरगुडे, सुरेश वाळुंज, योगेश यादव, आकश किवळे, मनोज मोरे, रामकृष्ण लांडगे, स्वराज पिजंण, विशाल उमाप, गणेश यादव, दिपक घन, रोहित कदम, विकास यादव, सोमनाथ यादव, स्वप्निल पोटघन, बालाजी पांचाळ, आकाश साळुंखे, प्रकाश चौधरी, शंशीकात पुंड, तात्यासाहेब सपकाळ, करण पाखरे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group