पिंपरी (Pclive7.com):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सन्मान करीत व त्याचा ‘उत्सव नव्हे, उत्तरदायित्व..!’ या मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणादायी संकल्पनेनुसार आमदार अमित गोरखे यांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. मुख्यमंत्री यांनी आदेशित केल्या प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी जाहिरातबाजी, फलक, पोस्टर अथवा वृत्तपत्र जाहिरातीऐवजी थेट मुख्यमंत्री सहायता निधी साठी मदतीचा हात पुढे केला आहे.

आमदार अमित गोरखे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा आदर्श सामाजिक सेवा आणि कर्तव्य निष्ठा शिकविणारा आहे. त्यांच्या प्रेरणेने आपणही गरजूंना मदत करण्यासाठी कृतीशील पावले उचलली पाहिजेत.”

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला अनुसरून अधिकाधिक नागरिक, जनप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी पुढे येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावे, असे आवाहनही अमित गोरखे यांनी केले आहे.

























Join Our Whatsapp Group