पिंपरी (Pclive7.com):- विशाल नगर डीपी रोड येथे आज विशाल नगर रेसिडेंट्स असोसिएशन (VNRA), पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग आणि पिंपळवन निसर्गसंवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

नुकत्याच पार पडलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड महापालिकेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे. या यशामध्ये नागरिकांच्या सक्रीय सहभागातून राबवले जाणारे उपक्रम महत्वाची भूमिका बजावत आहेत, यावर सर्वांनी एकमत व्यक्त केले.

स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढावा या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमात २५ हून अधिक सोसायट्यांचे रहिवासी सहभागी झाले, तर १०० पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह परिसरातील रस्ते, आणि सार्वजनिक जागा स्वच्छ केल्या.

या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी श्री. माने साहेब म्हणाले, – “स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाने स्वतः पुढाकार घेणे आवश्यक आहे. जर अशा उपक्रमांची अंमलबजावणी प्रत्येक प्रभागात झाली, तर आमच्या कर्मचाऱ्यांनाही कामासाठी उत्साह मिळतो, आणि नागरिकांनाही त्यांच्या योगदानाचे महत्त्व कळते.”

























Join Our Whatsapp Group