पिंपरी (Pclive7.com):- महाळुंगे एमआयडीसीत ट्रान्सपोर्ट व्यवसाय चालू ठेवण्यासाठी दरमहा २ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. निलेश उर्फ जग्गू नवनाथ मांडेकर (वय ३२ वर्षे, रा. आंबेठाण तालुका खेड जिल्हा पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी किरण पडवळ (व्यवसाय, पोकलँड जेसीबी मशीन, रा. आंबेठाण तालुका खेड जिल्हा पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेठाण तालुका खेड या गावाच्या हद्दीत आरोपी निलेश उर्फ जग्गू मांडेकर याने (दि.२१) रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी किरण पडवळ यांना खंडणी मागितली. महाळुंगे एमआयडीसी मधील ट्रान्सपोर्ट व्यवसाय चालू ठेवायचा असल्यास दरमहा २ लाख रुपये खंडणी द्यावी लागेल अशी धमकी दिली.

त्यानंतर किरण पडवळ यांनी पोलिसांत याबाबतची तक्रार दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तातडीने आरोपी विजय उर्फ जग्गू मांडेकर याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.























Join Our Whatsapp Group