पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकर आणि मावळवासियांना पाणीपुरवठा करणारे पवना धरण आज (दि.२५) सकाळी ९ वाजेपर्यंत ८३.१६ टक्के इतके भरले आहे. धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातून आज सकाळी ११ वाजता १४०० क्युसेक्सने विसर्ग करण्यात सुरू करण्यात येणार आहे.

पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीमध्ये ८३.१६ टक्के भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे.

धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता सकाळी ११ वाजता सांडव्यावरून नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने १४०० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे.

तरी, पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

























Join Our Whatsapp Group