चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड गावातील हेरिटेज प्लाझा येथील चार्कोल ईटस् या हॉटेल कॅफेमध्ये संध्याकाळी भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणतेही जीवित हानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवडगाव येथील हेरिटेज प्लाझा या इमारतीमध्ये चार्कोल इट्स या हॉटेल कॅफेमध्ये आज संध्याकाळी ओवन मध्ये शॉकसर्किट होऊन होऊन भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले.
अग्निशामक दलाच्या थेरगाव आणि पिंपरी दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते. यामध्ये दोन डी फ्रीज, दोन फ्रिज, चार ओवन व इतर मटेरियलचे नुकसान झाले.

या आगीच्या घटनेदरम्यान समोरच असलेल्या आदर्श ढोल ताशा पथकाचे प्रॅक्टिस करणारे ओंकार लोंढे, गौरव मेत्रे, विवेक परंगुळ, तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी शेजारील हॉटेल मधील सिलेंडर ताबडतोब बाहेर काढल्यामुळे येथे मोठी दुर्घटना टळली.
शेजारी एल प्रो मॉल व लिंक रोडवर आग लागल्यामुळे बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. चिंचवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीने दाखल होऊन अग्निशामक दलाच्या गाड्यांना रस्ता मोकळा करून देत गर्दी नियंत्रणात आणली.





















Join Our Whatsapp Group