पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन थेरगांव येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर, चिंचवड विधानसभा प्रमुख आनंत कोऱ्हाळे, उपशहर प्रमुख सोमनाथ गुजर, मुरलीधर ढगे, शिवाजी निंबाळकर उपस्थित होते.
युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी महाराष्ट्र भर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे अावाहन केले आहे. त्या अनुषंगाने काही दिवसापुर्वी पुणे-मुंबई महामार्ग पनवेल येथे वृक्षारोपणाची सुरूवात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली होती. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group