पिंपरी (Pclive7.com):- आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस लक्षवेधून घेणारा ठरणार आहे. राज यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये मनसेच्यावतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. उद्या (गुरूवार दि.१४) रोजी शहरात विविध सामाजिक उपक्रम तसेच कार्यक्रमांनी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी दिली.
राज ठाकरे यांच्या जन्म दिनानिमित्त गुरूवार दि.१४ रोजी सकाळी ७ वाजता आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानदेव महाराज मंदिरात अभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता पिंपरी विधानसभा प्रभाग क्रमांक ३० दापोडी येथे मनसे पक्षाचे शाखा उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच दीड वाजता दापोडी येथे गरीब विद्यार्थी यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य व धनादेश चेक वाटप करण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी येथील प्रभाग क्रमांक ३२ येथे शाखा उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडे तीन वाजता बिजलीनगर आकुर्डी रेल्वे स्टेशन गुरूद्वार जवळ अनाथ आश्रममध्ये मिठाई वाटप करण्यात येणार आहे. दुपारी ४.३० वाजता भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक १३ निगडी येथे मनसेची शाखा उद्घाटन करणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता रुपीनगर तळवडे येथे अनाथ आश्रमातील गरीब विद्यार्थींना शालेय साहित्य वाटप करून राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना राज्य मनसे उपाध्यक्ष गणेश सातपुते, रणजित शिरोळे यांच्यासह शहर कार्यकारिणी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.






















Join Our Whatsapp Group