चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह आणि २०,०००/- रुपयाचे पारितोषिक प्राप्त झाले. यावेळी आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार हेमंत रासने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे पदाधिकारी महेश सूर्यवंशी, प्रेरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकारामभाऊ गुजर, मानद सचिव कांतीलालदादा गुजर, संस्थेचे प्रतिनिधी अक्षय गुजर, ॲड. आकाश गुजर, प्राचार्य नाना शिवले, मुख्याध्यापक महेंद्र पवार, कलाशिक्षक दिलीप माळी आदी उपस्थित होते.

१९८१ मध्ये संस्थापक अध्यक्ष तुकारामभाऊ गुजर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली आणि मानद सचिव म्हणून कांतीलालदादा गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणारी प्रेरणा शिक्षण संस्था ही पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित शिक्षण संस्था आहे. हजारो विद्यार्थी या शिक्षणसंस्थेतून शिकून मोठे झाले आहेत. देश विदेशात उत्तम करिअर करत आहेत. शिक्षणाबरोबरच विविध उपक्रमात विद्यार्थी सहभागी होत असतात. गुणवत्ता संवर्धन अभियानातही शाळेने चमकदार कामगिरी केली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा सार्वजनिक मंडळांबरोबर शाळांनाही सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक विषयाच्या माध्यमातून गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आपल्या थेरगावच्या प्रेरणा विद्यालयाने यात सहभाग नोंदवला. आणि पहिल्याच वर्षी पहिला क्रमांक पटकावला. यात सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे अमूल्य योगदान आहे. पथनाट्य, गणेश गीते, संस्कार गीते, अथर्वशीर्ष पठण, लेझीम प्रात्यक्षिक अशा अनेक गोष्टींचा समावेश विद्यालयाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने केला होता.






















Join Our Whatsapp Group