पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही दिवसांपासून चाकण मधील वाहतूक समस्या हा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. त्याचे पडसाद अधिवेशनात सुद्धा बघायला मिळाले होते. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी भल्या पहाटेच भोसरीत येत कामाला सुरुवात केली. विशेष म्हणजे रात्री एक वाजता बीड जिल्हा दौरा आटपून अजित पवार पुण्यामध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पहाटेच भोसरीतील कामांची प्रथम पाहणी केली. नंतर चाकण मधील तळेगाव चौकात जाऊन थेट रस्त्यावर येत तेथील वाहतूक कोंडीच्या समस्येची माहिती घेतली आणि आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

चाकणच्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत तसेच चाकण -तळेगाव- शिक्रापूर, पुणे -नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भोसरी, चाकण येथे भल्या पहाटेच रस्त्यावर येत पाहणी दौरा केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

वास्तविक, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार आज पुणे जिल्हा दौऱ्यावरती असून पहाटे सहा वाजता पासूनच नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. विशेष म्हणजे रात्री एक वाजता बीड जिल्हा दौरा आटपून दादा पुण्यामध्ये पोहोचले व सकाळीच भल्या पहाटे भोसरी मध्ये त्यांनी आपल्या कामाची सुरुवात करत भारत माता चौक व अन्य ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येची माहिती घेतली. यावेळी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे पहिल्या पाहणी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र दिसले नाहीत.

दरम्यान, चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहत तसेच मुख्यमार्ग पुणे-नाशिक महामार्गावर (चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर) सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. औद्योगिक वसाहतीमुळे अवजड वाहनांची संख्या वाढलेली आहे. दररोज सुमारे एक लाखावर अवजड वाहने तसेच इतर वाहने ये-जा करतात. याबाबत नागरिक, कामगार, उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण यांचा मोठ्या प्रमाणात रोष आहे. ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती तसेच नागरिक, व्यावसायिक, डॉक्टर, उद्योजक, विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी वाहतूक कोंडीच्या विरोधात निषेध करून आंदोलन केले होते. वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी तसेच नवीन मार्ग व्हावेत अशी नागरिक, शेतकरी, कामगार, उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर यांची मागणी आहे.























Join Our Whatsapp Group