पिंपरी (Pclive7.com):- भक्ती शक्ती उद्यान ह्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने आज दि.०९ ऑगस्ट क्रांती दिन ह्या दिवशी राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला नाही. याप्रकरणी संबंधित ठेकेदार याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे सरचिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.

सचिन काळभोर यांनी म्हटले आहे की, देशातील सर्वात उंच १०७ मीटर राष्ट्रध्वज तिरंगा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी भक्ती शक्ती उद्यान या ठिकाणी ०४ कोटी खर्च करून उभारला आहे. वार्षिक ४६ लाख ८५ हजार रुपये झेंडा फडकावला जावा म्हणून ठेकेदार ह्यांना मानधन देण्यात येते. मात्र आज ९ ऑगस्ट क्रांती दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना भक्ती शक्ती चौकातील हा सर्वात उंच राष्ट्रध्वज मात्र फडकवला गेला नाही.

याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच यापुढे राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group