

पिंपरी (Pclive7.com):- बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी (दि.१०) दुपारी शंकरनगर येथील खदानीजवळ करण्यात आली.

पोलिस नाईक रामचंद्र तळपे यांनी या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सूरज शहाजी शेवाळे (२५, रा. अष्टविनायक चाळ, पावनेगाव, तुर्भे, नवी मुंबई) याला पोलिसांनी अटक केली.

विद्यानगर येथे खदानीजवळ एकजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्याच्याकडून ४० रुपये किमतीची पिस्तूल आणि ५०० रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त केले.
























Join Our Whatsapp Group