पुणे (Pclive7.com):- आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पुण्यात चक्क पाण्याखाली योगासने करून आशियाई विक्रम रचला जात आहे. पुण्यातील डॉ. खुशी परमार यांनी हा विश्वविक्रम रचण्याचे ठरविले आहे. त्यासाठी डॉ. खुशी पुण्यातील टिळक तलावात पाण्याखाली योगासने करत आहेत.
आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन वेगवेगळ्या पद्दतीने साजरा करण्यात येत आहे. पुण्यातील डॉ. खुशी परमार यांनीही चक्क पाण्याखाली ४ तास योगासने करत योग दिन साजरा करणार आहे. विश्वविक्रम रचण्याच्या दृष्टीने आपण हा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. लेक वाचवा, लेक शिकवा असा संदेशही या उपक्रमातून देत असल्याचे डॉ. खुशी यांनी सांगितले.
पुण्यातील बॅराकुडा डायव्हिंग, फिनकिक अॅडव्हेंचर यांच्या वतीने हा उपक्रम घेण्यात येत आहे. स्कूबा डायव्हिंगचे अनेक रेकॉर्ड खुशीच्या नावावर आहेत. त्यामुळे आज ४ तास डॉ. खुशी पाण्याखाली कशाप्रकारे योगासन करणार हे उत्सुकतेचे ठरले होते.