पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर हकरती नोंदवण्याची मुदत आज संपली आहे. १२८ नगरसदस्यांसाठीच्या ३२ प्रभागांमध्ये एकूण ३१८ हरकती नोंदवण्यात आल्या आहेत अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली.

त्यापैकी आज शेवटच्या दिवशी २७६ हरकती प्राप्त झाल्या. त्यातचं शेवटच्या तासाभरात हकरती देण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान अवघ्या ३२ हरकतीच प्राप्त झालेल्या होत्या. अपेक्षेप्रमाणे शेवटच्या दिवशी हरकती नोंदवण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

कोणत्या प्रभागात किती हरकती?
– प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वाधिक म्हणजे 115, प्रभाग 1 मध्ये 98, प्रभाग 20 मध्ये 31 आणि प्रभाग 6 मध्ये 15 हरकती नोंदवल्या गेल्यात.
– जवळपास 19 प्रभागांमध्ये एक अंकी हरकती प्राप्त झाल्यात.
– उर्वरीत प्रभाग क्रमांक 5, 13, 15, 16, 17, 18, 25, 27 आणि 28 या नऊ प्रभाग रचनेवर एकाने ही हरकत घेतली नाही.

तीन प्रभागात एक सारख्या हरकती..!
– प्रभाग क्रमांक 1 मधील 86 अर्जदारांची आणि 12 अर्जदारांची हरकत एकसारखी आहे.
– प्रभाग क्रमांक 10 मधील 52 अर्जदारांची, 38 अर्जदारांची आणि 22 अर्जदारांची हरकत एकसारखी आहे .
– प्रभाग क्रमांक 20 मधील 29 अर्जदारांची हरकत एकसारखी आहे.























Join Our Whatsapp Group