
वाकी खुर्द येथील भामा नदीत दोन जण बिरदवडी येथील विहिरीत एक जण, शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत एक जण अशा वेगवेगळ्या घटनात चार जण बुडाल्याची दुदैवी घटना घडली आहे.

वाकी खुर्द येथे भामा नदीत एक वीस वर्षाचा कोयाळीचा विद्यार्थी तसेच १९ वर्षाचा उत्तर प्रदेशातील तरुण आहे. शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत ४५ वर्षाचा पुरुष बुडालेला आहे. बिरदवडी येथील विहिरीतही एक तरुण बुडालेला आहे. भामा नदीतील बुडालेल्या तरुणांना रेस्क्यू पथकाने शोध मोहीम घेऊन काढण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका तरुणाचा मृतदेह मिळाला आहे.























Join Our Whatsapp Group