पिंपरी (Pclive7.com):-पिंपरी-चिंचवडमध्ये आज दि. २० सप्टेंबर सकाळी ९ वाजेपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसंवाद कार्यक्रम सुरू झाला असून काळेवाडीतील रागा पॅलेस हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमात नागरिकांना थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर समस्या मांडण्याची संधी आहे.

हा जनसंवाद कार्यक्रम नागरिकांसाठी थेट संवादाची सुवर्णसंधी ठरतो, जिथे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होते. या ठिकाणी मालमत्ता कर, बांधकाम परवानगी, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा सामाजिक न्याय, शिक्षण विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन, म्हाडा, पीएमआरडीए, नगर भूमापन, मुद्रांक व नोंदणी, महसूल, शिधापत्रिका, जिल्हा परिष, महावितरण, वीजपरवठा, सहकार, आरोग्य, पोलीस, क्रीडा, धर्मादाय आयुक्तालय, पीएमपीएल अशा सर्व विभागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकारी व कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

उपक्रमाचा उद्देश शासनाच्या निर्णयांची पारदर्शकता वाढवणे आणि नागरिकांच्या समस्यांचे त्वरीत निराकरण करणे हा आहे. रविवारी, २१ सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांशी देखील अजित पवार यांच्या भेटीगाठी होणार आहेत.

या भेटीमुळे पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना आपल्या प्रश्नांचे थेट निराकरण मिळवण्याची अनोखी संधी प्राप्त झाली आहे.






















Join Our Whatsapp Group