
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार; गायक अवधूत गांधी, अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, अभिज्ञा भावे, मृण्मयी देशपांडे यांचा विशेष सहभाग
पिंपरी (Pclive7.com):- आपल्या प्राचीन परंपरेचे स्मरण करत, ‘रावण दहन’ या सणाचे औचित्य साधून पिंपळे सौदागर येथे भव्य रावण दहन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नगरसेवक मा.शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित हा सोहळा 2 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होणार आहे.

सालाबादप्रमाणे यावर्षीही भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष (जिल्हा) शत्रुघ्न सिताराम काटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारण्यात येणार आहे.

जेष्ठ नेते, नामदार तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती राहणार आहेत.

गुरुवार, दि.2 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 ते 10.00 या वेळेत गोविंद यशदा चौक, नेक्सा शोरूम समोर,बीआरटी रोड,पिंपळे सौदागर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक मनोरंजनाचे कार्यक्रम, आकर्षक देखावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भव्य रावण दहन सोहळा यांचा समावेश असेल.

मनोरंजनाची भर म्हणून या सोहळ्याला काही नामवंत कलावंत उपस्थित राहणार आहेत. यामध्ये गायक अवधूत गांधी, तसेच मराठी बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर, तारिणी सिरीयल फेम अभिनेत्री अभिज्ञा भावे, मना’चे श्लोक’ चित्रपट अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांचा समावेश आहे. या कलाकारांचे विशेष सादरीकरण हे उपस्थितांसाठी पर्वणी ठरणार आहे.

आयोजक शत्रुघ्न (बापू) काटे युथ फाउंडेशन यांनी पिंपरी-चिंचवडसह परिसरातील नागरिकांना आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमास उपस्थित राहून आनंद व उत्साह द्विगुणीत करावा, असे आवाहन केले आहे.






















Join Our Whatsapp Group