पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव येथील स्विस काउंटी हौसिंग सोसायटीत रविवारी सकाळी स्विस काउंटी सांस्कृतिक मित्र मंडळ आणि स्वरांजली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दीपावली पहाट कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात सादर झालेल्या भक्तीगीत, अभंग, शास्त्रीय संगीत आणि भावगीतांच्या मनोहारी मैफलींनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सकाळी लवकर सुरू झालेला हा कार्यक्रम तब्बल सकाळी ९.३० वाजेपर्यंत रंगला, आणि प्रेक्षकांनी शेवटपर्यंत उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.

या कार्यक्रमाला समाजातील नागरिकांचा तसेच मान्यवरांचा मोठा प्रतिसाद लाभला. स्विस कौंटी सांस्कृतिक मित्र मंडळाचे अध्यक्षांनी सांगितले की, “प्रेक्षकांचा उत्साह आणि कलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी ठरला.”
या कार्यक्रमाच्या यशामागे स्विस काउंटी सांस्कृतिक मित्र मंडळ आणि स्वरांजली ग्रुप यांचे परिश्रम तसेच सर्व रहिवाशांचे सहकार्य मोलाचे ठरले.






















Join Our Whatsapp Group