पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीतील दिपस्तंभाप्रमाणे उल्लेखनीय समाजोपयोगी कार्यासाठी दिला जाणारा दिपस्तंभ पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री काका कोयटे व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे बंधू मंचकराव पाटील यांच्या हस्ते मराठवाडा पतसंस्थेला देण्यात आला.

हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. जेवळे दयानंद विश्वनाथ, उपाध्यक्ष श्री. जगताप भास्कर सचिव श्री धोंडगे दत्तात्रय, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. भोसले ज्योती निखिल कर्मचारी सौ निकम कुंदा यांनी स्विकारला.
संस्थेच्या सहकार क्षेत्रातील भरीव योगदानाबददल पुणे-सोलापूर विभागातून २०२४-२०२५ या वर्षा चा दिपस्तंभ द्वितीय कमांक चा पुरस्कार “मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था” ला जाहीर करणेत आला.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षातच हा पुरस्कार संस्थेला मिळणे हा केवळ योगायेग नसून आम्ही केलेल्या आर्थिक व सामाजिक कार्याची पोचपावती आहे. हा पुरस्कार म्हणजे संस्थेतील पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्या कष्टाचे फळ आहे. हा पुरस्कार केवळ संस्थेचा नसून सर्व सन्माननीय ठेवीदार, भागधारक खातेदाराचा आहे त्यांच्या आमच्यावरील अतुट विश्वासामुळेच आम्हांला हा पुरस्कार मिळाला अशी भावना मा. अध्यक्षांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर व्यक्त केली.






















Join Our Whatsapp Group