
पिंपरी (Pclive7.com):- दिवाळीला मातीचे गड-किल्ले बनवण्याची मजा काही औरच असते. रात्रभर जागरण करून, वेगवेगळ्या आकाराचे मातीचे गड-किल्ले बनवण्याची परंपरा आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला किल्ले प्रतापगड पिंपळे निलख येथील श्री गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साकारला आहे. विशेष म्हणजे हा किल्ला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केवळ एका रात्रीत तयार केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत गड-किल्ले साकारण्यासाठी मुलांमध्ये जो उत्साह होता तो आता कमी झाल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच छोट्या बच्चे कंपनीमध्ये उत्साह आणि किल्ला बनवण्याची इच्छा निर्माण करण्यासाठी पिंपळे निलख येथील श्री गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी दिवाळीत किल्ला बनवतात. यंदाच्या वर्षी या कार्यकर्त्यांनी हुबेहूब किल्ले प्रतापगडाची प्रतिकृती साकारली आहे. विशेष म्हणजे हा किल्ला या तरुणांनी एका रात्रीत साकारला आहे. या किल्ल्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली असून हा किल्ला पाहण्यासाठी बच्चे कंपनी तसेच परिसरातील नागरिक देखील गर्दी करत आहेत.

हा किल्ला साकारण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते प्रतीक पांचाळ, महेश सूर्यवंशी, मायकल डेव्हिड, प्रथमेश ढगे, शिवम ढगे, शंकर धोडसपुर, सागर धोडसपुर, अर्जुन जाधव, सौरभ सोनी, संकेत कणसे, सुजल वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.























Join Our Whatsapp Group