पिंपरी (Pclive7.com):- शौर्य फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण बनसोडे यांच्या वतीने आज लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरा मधील सुमारे २०० गरजू, गोरगरीब, बेघर असणाऱ्या नागरिकांना फराळ आणि मिठाईचे वाटप केले. या निमित्ताने त्यांच्या दिवाळीमध्ये सामील होऊन सण साजरा करण्यात आला.

या प्रसंगी प्रवीण बनसोडे म्हणाले की, त्यांच्या फाउंडेशन तर्फे नेहमी सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात व गोरगरीब व्यक्तींच्या आनंदामध्ये सामील घेऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. ह्या प्रसंगी त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्य मार्गदर्शक सय्यद (भाई) दस्तगीर, उपाध्यक्ष सुरज भंडारी, सचिव सौरभ भालेराव, कार्याध्यक्ष निळकंठ कचरे, संपर्क प्रमुख स्वप्नील म्हस्के, निवेदन राजू जाधव, राज बनसोडे, हिरकणी कचरे, करण सरवदे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group