चिंचवड (Pclive7.com):- पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सालाबादप्रमाणे चिंचवड पोलीस स्टेशन आणि चिंचवड वाहतूक विभाग येथील पोलीस बांधवांना दिपावली निमित्त मिठाई भेट देऊन दिपावलीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष गजानन चिंचवडे शुभम चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड, पुणे जिल्हा उद्योजक आघाडीचे अध्यक्ष श्रीकांत खुळगे, खेड विधानसभा अध्यक्ष संग्राम लाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.