पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील बिजलीनगर भागात बिजलीनगर उत्सव समिती यांच्या पुढाकारातून परिसरातील नागरिक दरवर्षी दीपोत्सव साजरा करतात. यंदाचे वर्ष राष्ट्रीय विचारांनी प्रेरित राष्ट्रहित आणि सेवाकार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दीवर्ष असल्याने त्यावर आधारित रेखाचित्र काढून त्यावर तब्बल १५०० पणत्या लावून भव्य दीपोत्सव साजरा करीत संघाच्या राष्ट्रकार्याची, सेवाकार्याची दखल घेतली. बिजलीनगर दीपोत्सवाचे हे १७ वे वर्ष होते.

भारतीय संस्कृतीत दिवाळी सणात दीपोत्सवाचे विशेष महत्व आहे. या ठिकाणी दरवर्षी देशातील प्रचलित विषयावरील रेखाचित्र तयार केले जाते, या वर्षीची संकल्पना संघ शताब्दी वर्ष असे होते यामध्ये भगवा ध्वज, शंख वाजवत असलेला गणवेशधारी स्वयंसेवक, वरील भागात ‘संघ शक्ती युगे युगे‘ व खालील भागात १०० असे दाखवले होते. या मधे १५०० तेलाचे दिवे सर्व नागरिकांनी लावले. मोठ्या संख्येने परिसरातील मान्यवर, नागरिक, महिला, लहान मुले मोठ्या संख्येत उपस्थित होती. वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.























Join Our Whatsapp Group