आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; दिनेश यादव यांचा पुढाकार
पिंपरी (Pclive7.com):- आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांच्या पुढाकाराने आणि शेठ माणिकचंद फाउंडेशन संचलित विश्व कल्याण इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे आयोजित शालेय क्रीडा स्पर्धांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भरभरून सहभाग नोंदवला.

या स्पर्धा पूर्णानगर येथील शनी मंदिर ग्राउंडवर आयोजित केल्या होता.कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार नेते सचिन लांडगे, इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा यादव उपस्थित होत्या. आयोजन भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

यावेळी सचिन लांडगे म्हणाले या स्पर्धा भरविल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करावे लागेल. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना मैदानाकडे वळवणे हे मोठे जिकरीचे काम झाले आहे. स्मार्ट मोबाइलमुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा वेळेला पारंपारिक मल्लखांब, दांडपट्टा, लाठीकाठी,फायर जम्प, कराटे, मार्शल आर्ट्स आणि इतर खेळांची या विद्यार्थ्यांना गोडी लावणे अत्यंत आवश्यक आहे. दिनेश यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकारच्या स्पर्धा भरून विद्यार्थ्यांना मैदानाकडे पुन्हा एकदा येण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचे आहेत. सध्या अनेक पारंपरिक खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. हे पारंपारिक खेळच पुढील अनेक महत्त्वाच्या खेळांचे ‘बेस’ आहेत. त्यामुळे या खेळांना राजाश्रय मिळवून देणे. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे हाच एक मुख्य हेतू होता.
– दिनेश यादव
अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा
























Join Our Whatsapp Group