वाकड (Pclive7.com):- वाकड येथे एक भव्य आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आला असून, यामध्ये विश्वविख्यात आध्यात्मिक प्रवक्त्या कुमारी जया किशोरीजी यांच्या सुमधुर अमृतवाणीतील ‘श्रीकृष्ण लीला (मायरा कथा)’ या प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि.२४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत टीप टॉप हॉटेल जवळ, सयाजी हॉटेल समोर, वाकड येथे भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.

या आध्यात्मिक सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे भक्तिसंगीतासह ज्ञान, अध्यात्म आणि भक्तीची मेजवानी मिळणार असून, उपस्थित भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राम वाकडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
कार्यक्रमाची माहिती :
- दिनांक : २४, २५ आणि २६ नोव्हेंबर २०२५
- वेळ : सायं. ६:०० वाजता
- स्थळ : टीप टॉप हॉटेल जवळ, सयाजी हॉटेल समोर, पुणे–मुंबई हायवे, वाकड, पुणे

आध्यात्मिकतेचा नवा अनुभव देणारा हा कार्यक्रम वाकड तसेच परिसरातील भक्तांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे.


























Join Our Whatsapp Group