पिंपरी (Pclive7.com):- पुनावळे गाव येथील 7 प्ल्यूमेरिया ड्राईव्ह सोसायटीत युवा सेनेच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, मावळ लोकसभा शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे,शिवसेना उपनेत्या सुलभाताई उबाळे, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख सागर दत्तात्रय दत्तात्रय पाचर्णे व युवासेना चिंचवड विधानसभा उपशहर प्रमुख सागर एकनाथ शिंदे यांनी या आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरात रक्तदान शिबिर हेल्थ चेकअप डोळे तपासणी रक्त तपासणी यासह कॅन्सर तपासणी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुढील काही दिवसात पुनावळे गावात अनेक सोसायटी मध्ये हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सागर पाचार्णे आणि सागर शिंदे यांनी दिली.

7 प्ल्यूमेरिया ड्राईव्ह सोसायटीत झालेल्या या आरोग्य शिबिरात सोसायटी अध्यक्ष गणेश भामे, सचिव शिवराज हराळे, खजिनदार धनंजय पाठक, अमोल डोंगरे, राहुल पवार, विनोद मुळीक, सुरज घाडगे, अतुल कुलकर्णी, युवासेना कॉलेज कक्ष सरचिटणीस ह्रिषीकेश जोशी, मनोज गुप्ता आदी उपस्थित होते.



















Join Our Whatsapp Group