पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर धनगर समाज महासंघाच्या वतीने आज पिंपरीतील अहिल्यादेवी होळकर पुतळ्यासमोर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आरक्षण स्मरण आंदोलन घेण्यात आले. धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन बारामती येथे झालेल्या धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनास आज १५ जुलै रोजी ४ वर्षे पुर्ण झाली. या ऐतिहासीक आंदोलनाचे स्मरण शहरातील सर्व धनगर समाजास व्हावे या हेतुने हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामध्ये प्रामुख्याने सरकारने येत्या ४ ते ५ महिन्यात कोणत्याही परिस्थितीत धनगर समाजाला ST चे आरक्षण जाहीर करावे आणि बारामती मधील आंदोलनकर्त्यांना आंदोलन थांबविण्यासाठी दिलेला आपला शब्द पुर्ण करावा ही विनंती करण्यात आली. ६० वर्षे काँग्रेसने समाजाला आरक्षणा पासुन वंचित ठेवले. म्हणुन मागील निवडणुकीत समाज भाजपच्या पाठीशी राहिला, आणि जर भाजप सुध्दा समाजाला आरक्षणा पासुन दुर ठेवणार असेल तर आमचा हा समाज आपल्या न्याय हक्कासाठी या शासनाच्या विरोधात जायला सुध्दा कमी करणार नाही अशी मते आंदोलनाच्या वेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
भर पावसात भिजत धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष राजू दुर्गे, अशोक खरात, वीणा सोनवलकर, उमेश बरकडे, श्रीकांत धनगर, राजेंद्र घोडके, गोरख खामगळ, महादेव कवितके, बंडू मारकड, कैलास कोपनर, तानाजी कोपनर, दाजी वायकुळे, दादा कोपनर, सागर मारकड, गणेश देवकाते, धनंजय गाडे, श्री गडदे साहेब, नागेश तितर, सदाशिव पडळकर, रणजित गोरड, दत्ता शेंडगे, महावीर काळे, भरत गोयेकर, बिरु व्हनमाणे, अजयदादा दुधभाते, नवनाथ बिडे, रुपेश रुपनर, शिवाजी बिटके, दत्ता सोनवलकर, सचिन शिंदे, गणेश खरात, तुकाराम वाघमोडे, अनुराज दुधभाते, आदी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशस्वी केले.