मुंबई (Pclive7.com):- आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी, विशेषतः मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीसाठी, सत्ताधारी महायुतीने (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या रात्री उशिराच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पक्षाची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

तथापि, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये परिस्थिती वेगळी असण्याची शक्यता आहे.या दोन्ही शहरांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्यावर ठाम आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महायुतीतील मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय झाला आहे. जागावाटपासाठी लवकरच स्थानिक पातळीवर समन्वय समित्या स्थापन केल्या जातील.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) मोठा प्रभाव असल्याने, दोन्ही पक्ष आपापल्या बळावर निवडणुका लढवण्यास उत्सुक आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले होते.

स्थानिक पातळीवरील मतभेद आणि कुरघोडी थांबवून महायुतीची एकजूट दाखवणे आणि जास्तीत जास्त जागा जिंकणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. या निर्णयामुळे मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे गट एकत्र येतील, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.






















Join Our Whatsapp Group