पिंपरी (Pclive7.com):- रामनगर, मोहननगर आणि फुलेनगर परिसरात भाजपच्या इच्छुक उमेदवार कैलास कुटे, प्रसाद शेट्टी, मीनलताई यादव व ऐश्वर्याताई बाबर यांना नागरिकांकडून विशेषतः महिलांकडून, प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र रविवारी सायंकाळी पाहायला मिळाले.

रविवारी (दि.२८) सायंकाळी पाच वाजता रामनगर येथील श्री राम मंदिरात श्री दिलीपभाऊ दातीर पाटील व श्री गणेश दातीर पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर रामनगर, मोहननगर व फुलेनगर परिसरातील विविध चौकांमध्ये महिलांनी चारही इच्छुक उमेदवारांचे औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

माजी नगरसेविका मीनल यादव यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पदयात्रेदरम्यान परिसरातील ग्रामदेवतांना नारळ फोडून नतमस्तक होत पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज कमान येथे समारोप करण्यात आली.

यावेळी भाजपचे इच्छुक उमेदवार कैलास कुटे, प्रसाद शेट्टी, मीनलताई यादव व ऐश्वर्याताई बाबर यांना परिसरातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. या जनसमर्थनामुळे परिसरात भाजपच्या प्रचाराला अधिकच बळ मिळाल्याचे दिसून आले.






















Join Our Whatsapp Group