पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी गाव, अशोक थिएटर, जिजामाता हॉस्पिटल परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक २१ मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून उषाताई संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उषाताई वाघेरे या तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची जबाबदारीही यशस्वीरीत्या सांभाळली आहे. पिंपरी गाव व परिसराच्या विकासकामांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर पूल, डेअरी फार्म परिसरातील रेल्वे उड्डाणपूल तसेच अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विकासकामांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. या कामांमुळे परिसरातील दळणवळण व नागरी सुविधा अधिक सक्षम होत आहेत.

अनुभव, विकासाभिमुख नेतृत्व आणि जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे उषाताई वाघेरे यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून प्रभाग २१ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार सुरू असून निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे.
























Join Our Whatsapp Group