लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रभागाचा विकास करणार – माऊली जगताप
पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक ३१ मध्ये माऊली जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माऊली जगताप यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त केले असून लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या कार्याचा वसा कामाच्या माध्यमातून पुढे नेणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

सांगवी, पिंपळेगुरव भागामध्ये लक्ष्मणभाऊ कला क्रीडा अकॅडमीच्या माध्यमातून माऊली जगताप यांचे क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले योगदान आहे. अनेक युवकांना या कला क्रीडा अकॅडमीच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी पाठिंबा मिळाला आहे. लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांचे ते खंदे समर्थक मानले जातात.

सांगवी, पिंपळे गुरव भागामध्ये जगताप कुटुंबियांचे मोठे योगदान मानले जाते. या भागांमधील मतदार नेहमीच जगताप कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहतात. भाजपने या भागामध्ये विकास कामांच्या माध्यमातून स्वतःची वोट बँक निर्माण केली आहे. त्यामुळे जगताप यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या विश्वासाची खात्री निर्माण झाली आहे.

भाजपच्या विकासाचे “व्हिजन” हाच अजेंडा ठेवून लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी काम केले. त्यांच्या विकासाचा वसा आणि वारसा पुढे ठेवून आमदार शंकर जगताप काम करत आहे. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत.त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत..– माऊली जगतापउमेदवार, प्रभाग क्रमांक 31.
























Join Our Whatsapp Group