पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आणखी एक बिनविरोध यश मिळालं आहे. प्रभाग क्रमांक १० (शाहूनगर – संभाजीनगर – मोरवाडी – विद्यानगर) मधून भाजपच्या सुप्रिया चांदगुडे या बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा हा दुसरा बिनविरोध नगरसेवक ठरला आहे.

सुप्रिया चांदगुडे यांना यापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांनी पुनरागमन करत नगरसेवक होण्याचं स्वप्न साकार केलं आहे. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा भालेराव, मनसेच्या गीता चव्हाण तसेच दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

याआधी भोसरीतील भाजपचे रवी लांडगे हेही बिनविरोध निवडून आले असून, भाजपसाठी पिंपरी चिंचवडमध्ये ही निवडणूक सकारात्मक ठरत असल्याचं चित्र दिसत आहे.

























Join Our Whatsapp Group