पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी विधानसभेचे माजी अध्यक्ष तसेच मोहननगर परिसरातील युवकांचे आधारस्थान असलेले श्री. आयुषभाऊ निंबाळकर यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. तसेच यावेळी मोहननगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. कमलेशजी मुथा यांनी देखील भाजपात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रवेश पार पडले. या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुक प्रचार शुभारंभ संपन्न झाला. यावेळी भोसरीचे दमदार आमदार श्री. महेशदादा लांडगे, चिंचवड विधानसभेचे आमदार श्री. शंकरशेठ जगताप, आमदार श्री. अमितजी गोरखे, आमदार उमाताई खापरे, शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न बापू काटे यांच्यासह प्रभाग क्रमांक 14 मधील भाजपा आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार सौ. मीनलताई विशाल यादव, सौ. ऐश्वर्या बाबर, कैलास कुटे, प्रसाद शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आयुष निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे चित्र आहे. त्यांच्या समवेत मोहननगर, काळभोर नगर व आकुर्डी विभागातील शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

श्री. आयुष निंबाळकर यांचे डी. बी. निंबाळकर इंग्लिश स्कूल तसेच निंबाळकर प्राथमिक व माध्यमिक मराठी प्रशाला असल्यामुळे प्रभागात विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. या व्यापक संपर्काचा लाभ आगामी काळात भाजप पक्षाला नक्कीच होईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
























Join Our Whatsapp Group