पिंपरी (Pclive7.com):- काल झालेल्या बिनविरोध निवडीनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि प्रामाणिक नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत प्रभाग क्रमांक १० मधून भाजपा उमेदवाराला महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट, सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेने आज अधिकृत पाठींबा जाहीर केला आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी तसेच पुणे परिसरात कामगार क्षेत्रात कार्यरत असलेली ही संघटना कामगारांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रस्तावित उमेदवाराने समाजहिताचं राजकारण आणि विकासमुखी दृष्टीकोन जोपासला असल्याने, संघटनेने हा पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. भाजपच्या विचारधारा, प्रेरणा आणि लोककल्याणकारी धोरणांवर विश्वास ठेवून संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन पक्ष उमेदवाराच्या विजयासाठी काम करणार आहेत.

हा जाहीर पाठिंबा महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट, सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष आझमभाई खान यांच्या हस्ते आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयात लेहीपत्राद्वारे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, कामगार नेते तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group