पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी परिसरात घरोघरी जाऊन घड्याळाचे चिन्ह पोहचवून प्रचार केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराचा आजचा पहिला रविवार होता. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवारांनी प्रचारात आक्रमकपणे आघाडी घेतली. प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांनी (दि. ३), शनिवारी आनंद नगर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. ढोल, ताशाच्या निनादात महिला भगिनींनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी साखर, पेढे भरवून आशीर्वाद दिले.

यावेळी माजी नगरसेवक धनराज आसवानी, कोमल दीपक आसवानी, लहू तोरणे, जय आसवानी, मंगल जाधव, अविष्कार बनसोडे, सोनू म्हात्रे, छाया भडकुंबे, मंगल पवार, राजाराम जाधव, रेश्मा खरात, सलोनी सूर्यवंशी, साखराबाई बोरुडे, कोमल तडसरे, केसरबाई तडसरे, स्वाती सूर्यवंशी, केसरबाई तुरुकमारे, पुनम रोकडे, श्रद्धा रोकडे यांनी प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना घड्याळ चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.

यावेळी उमेदवारांनी महिला भगिनींशी संवाद साधला आणि सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी रोड शहराचा सर्वांगीण विकास केला आहे आता विकासाचा वेग आणखी वाढवण्यासाठी व झोपडपट्टी परिसरात, वस्तीवर विकास प्रकल्प राबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी आनंद नगर परिसरातील नागरिक मोठे योगदान द्यावे असे आवाहन केले. आगामी काळात विविध योजना आणि प्रशिक्षण, प्रकल्पाचा लाभ तळागाळातील युवती, महिला भगिनींना मिळवून दिला जाईल. यावेळी उपस्थित असलेल्या मतदारांनी राष्ट्रवादी जिंदाबाद च्या घोषणा दिल्या.
























Join Our Whatsapp Group