पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम थेरगाव, गणेश नगर येथील गणेश मंदिर परिसरात होणार आहे.

या शुभमुहूर्तावर प्रभागातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उमेदवारांच्या वतीने करण्यात आले आहे. युतीच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, परिसरात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात शिवसेना–राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार विश्वजीत श्रीरंग बारणे, रुपाली रूपाली लालासाहेब गुजर, माया संतोष बारणे आणि निलेश हिरामण बारणे हे सहभागी होणार आहेत. विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या मुद्द्यांवर आधारित प्रचार करण्यात येणार असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी युतीला संधी देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

मतदान गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. धनुष्यबाण, ऑटो रिक्षा आणि घड्याळ या चिन्हांसमोरील बटण दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group