रहाटणी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक २७, रहाटणी येथील गजानन नगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरा सभा उत्साहात पार पडली. या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाजपाच्या चारही उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला.

भारतीय जनता पक्ष व आरपीआय आठवले पक्षाचे अधिकृत उमेदवार अ – श्री. बाबासाहेब (बाबा) त्रिभुवन, ब – सौ. सविता बाळकृष्ण खुळे, क – सौ. अर्चना विनोद तापकीर आणि ड – श्री. चंद्रकांत (आण्णा) बारकू नखाते यांनी प्रचारात आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेने त्यांची घोडदौड सुरू असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

कोपरा सभेच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधताना आमदार शंकर भाऊ जगताप यांनी भाजपच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. रहाटणी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असून पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या सभेमुळे परिसरात भाजपाच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे दिसून येत असून नागरिकांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.





















Join Our Whatsapp Group