आकुर्डीत महिलांची ताकद बेंद्रे- जावळकर यांच्या पाठीशी
आकुर्डी (Pclive7.com):- आकुर्डी परिसरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन गौतम बेंद्रे आणि समीर दिलीप जावळकर यांना महिलांचा मोठा व जाहीर पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रभागातील विविध सोसायट्या, वस्त्या व परिसरातील महिलांनी एकत्र येत उमेदवारांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत उघडपणे पाठिंबा जाहीर केला.

महिलांनी सांगितले की, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, महिला सुरक्षितता, आरोग्य सुविधा तसेच मुलांच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर चेतन बेंद्रे आणि समीर जावळकर यांनी नेहमीच ठोस भूमिका घेत पुढाकार दाखवला आहे. जनतेशी थेट संवाद, तातडीने समस्या सोडवण्याची कार्यपद्धती आणि सर्वसामान्य महिलांच्या प्रश्नांबाबत असलेली संवेदनशीलता यामुळेच आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत, असे मत महिलांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना चेतन बेंद्रे म्हणाले, “प्रभाग क्रमांक १५ मधील महिलांचा विश्वास आणि पाठिंबा हीच आमच्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे. महिलांचे सक्षमीकरण, सुरक्षितता आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू.”

समीर जावळकर यांनीही महिलांचे आभार मानत सांगितले, “प्रभाग क्रमांक १५ च्या सर्वांगीण विकासात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या सहभागातूनच खरा बदल घडेल.”
महिलांच्या या जाहीर पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक १५ मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीत हा पाठिंबा निर्णायक ठरेल, असा विश्वास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group