पिंपरी (Pclive7.com):- उपमुख्यमंत्री अजित पवारचं महाराष्ट्राचे आका आहेत. असा पलटवार करत पैलवान महेश लांडगेंनी शड्डू ठोकलेत. एक तर तुम्ही स्वतःचा भ्रष्टाचार लपवायला भाजपमध्ये आलाय. आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा. मुळात ते स्वतः आका आहेत, हे त्यांनी जाहीर करावं. मला पिंपरी चिंचवडचा ते आका म्हणतायेत, मुळात तेच महाराष्ट्राचा आका आहेत. असा पलटवार करत एकेकाळचे वस्ताद असलेल्या अजित दादांना पैलवान महेश लांडगेंनी कुस्तीचं आव्हान दिलंय.

त्यामुळं आता खऱ्या अर्थाने पूर्वीचे वस्ताद अजितदादा विरुद्ध पैलवान महेशदादा अशी लढाई पिंपरी चिंचवडच्या आखाड्यात सुरु झालीये. सध्या अजित पवारांचा अहंकार बोलतोय, ते नैराश्यात आहेत, अशी घणाघाती टीका ही लांडगेंनी केली आहे.

पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा आका संपवायचा आहे, असा आरोप अजित पवारांनी केल्यानंतर लांडगे ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या अजित पवारांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करु नयेत. मुलगा पार्थ पवारांचे पराक्रम पहा. असा इशारा लांडगेंनी दिला.
जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी चिंचवडचे होतील का? असं म्हणत लांडगेंनी अजित पवारांची खिल्ली उडवली. आमच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करायचे असतील तर मी, पालिका प्रशासन आणि अजित दादांनी समोरासमोर बसावं. मग सर्व उत्तर मिळतील. असं आव्हान महेश लांडगेंनी दिलं आहे.






















Join Our Whatsapp Group