पिंपरी (Pclive7.com):- ग्रामविकास, महिला बालकल्याण मंत्री नामदार पंकजाताई गोपीनाथ मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. काळभोरनगर प्रभाग क्रमांक १४ या ठिकाणी वृक्षारोपण तसेच चिंचवडमधील तालेरा हॉस्पिटल येथे फळ वाटप असा दुहेरी कार्यक्रम घेण्यात आला.
पिंपरी चिंचवड भाजपा शहर अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक राजू दुर्गे आणि कुमारी तेजस्विनी दुर्गे यांनी केले होते. कार्यक्रमास लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, माजी शहर अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश चिटणीस उमाताई खापरे, सरचिटणीस अमोल थोरात नगरसेविका योगिता नागरगोजे, नगरसेवक नामदेव ढाके, माऊली थोरात, देविदास पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष नगरसेवक रवी लांडगे, अनुप मोरे, वैशाली खाडे, दिपक नागरगोजे, अजित कुलथे, माजी नगरसेवक रघुनंदन घुले, भिमा बोबडे, विजय लांडे, यशवंत भोसले, धर्मा पवार, मनोज तोरडमल, कैलास सानप, फारुख शेख, भाई भोसले, आमीनभाई, पोपट बाराहाते, अंकुश ताम्हाणे, श्री सोनवणे, अनिल देसाई, बाळासाहेब एरोंडले, अलबेल सिंग आदी सर्वजण उपस्थित होते.