पिंपरी (Pclive7.com):- प्रचाराची मुदत अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रभाग 26चे उमेदवार ॲड. विनायक गायकवाड, आरती चोंधे, स्नेहा कलाटे, संदीप कस्पटे आणि कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोचण्यासाठी अधिक आक्रमक झाले आहेत.

१३ जानेवारी ही अखेरची मुदत असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. राजकीय पटलावर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्या तरी उमेदवारांच्या हाती फक्त एकच दिवस उरला असल्याने प्रचार टिपेला पोचला आहे. त्याअंतर्गतच उमेदवारांनी आज (ता.१२) अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. पिंपळे निलख गावठाणात पदयात्रा काढण्यात आली.
तसेच, परिसरातील उर्वरित सोसायट्यांमध्ये बैठका घेण्यात आल्या. ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरापासून पदयात्रेला सुरवात झाली. ग्रामस्थांपासून, दुकान व्यावसायिक, विक्रेत्यांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते, महिला व युवक या पदयात्रेत बहुसंख्येने सहभागी झाले होते.

“जनतेचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि सतत्यपूर्ण काम या बळावर प्रभागाला सुजलाम- सुफलाम व आदर्श बनविण्याचा आमचा निर्धार आहे,” असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले. “वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊनच विकासकामे केली जातील,” असे चोंधे म्हणाल्या. ” प्रभागाचा ‘सुपरफास्ट’ विकास आणि ‘स्मार्ट सिटी’तला ‘स्मार्ट प्रभाग’, हे आमचे प्रमुख ध्येय आहे”, असे कलाटे यांनी सांगितले.
“नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग, विश्वास आणि सहकार्यातून प्रभाग अधिकच स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करण्यावर आमचा भर राहील,” अशी ग्वाही कस्पटे यांनी दिली.
























Join Our Whatsapp Group