पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १० तसेच प्रभाग क्रमांक १४ येथे उमेदवारांच्या वतीने कोपरा सभा व गाठी-भेटींचे आयोजन करण्यात आले होते. शाहूनगर, संभाजीनगर आदी भागांमध्ये झालेल्या या प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत आमदार अमित गोरखे यांनी परिसरातील प्रलंबित प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली.

शाहूनगर व संभाजीनगर हे विकासाचे ‘रोल मॉडेल’ असूनही पाणी व वीज यासेच सोसायट्यांचे Completion Certificate (पूर्णत्वाचा दाखला) रखडलेले आहेत. तसेच अनेक रहिवासी सोसायट्यांच्या आजूबाजूला असलेल्या वाईन शॉप्समुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठोस निर्णय घेऊन हे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
प्रचाराच्या निमित्ताने विविध ठिकाणी झालेल्या कोपरा सभांमध्ये बोलताना, ज्या भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे त्या भागांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शेल्टर उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच रखडलेले SRA प्रकल्प पूर्ण करून गोर-गरीब जनतेचा कायमस्वरूपी निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हाडा-मोरवाडी येथील रखडलेला भुईवाड्याचा प्रश्न तसेच काळभोरनगर व मोहननगर परिसरातील विजेचा प्रश्न योग्य पद्धतीने आणि लवकरच मार्गी लावण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टीच्या व्हिजनबाबत माहिती देताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, तरुण, उद्योजक, MSME, स्टार्टअप्स आणि स्थानिक उद्योगांना चालना देणे, गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, औद्योगिक पायाभूत सुविधा विकसित करणे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणे हे भाजपचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यामुळे शहर व राज्याची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कला-संस्कृतीचे जतन, क्रीडा सुविधा, युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, धार्मिक-सामाजिक सौहार्द व सामुदायिक ऐक्य मजबूत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी नागरिकांसमोर मांडली आणि नागरिकांना १०० टक्के आश्वस्त केले.
मोरवाडी, म्हाडा व लालटोपीनगर परिसरातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विविध मुद्द्यांवर आमदार अमित गोरखे यांनी झालेल्या सभेत सविस्तर भूमिका मांडली. मोरवाडीतील वाढत्या वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विनाकारण वाढवलेले फुटपाथ कमी करून वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुलांसाठी सुरक्षित खेळाचे मैदान, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस गस्त वाढवणे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व सुरक्षित बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी मोरवाडीतील जुन्या व मोडकळीस आलेल्या म्हाडा तसेच खासगी सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी सर्व प्रशासकीय पातळीवर पूर्ण सहकार्य केले जाईल, असे सांगितले. गुलमोहर सोसायटीसमोर लहान मुलांसाठी अत्याधुनिक मॅट ग्राउंडसाठी आमदार निधीतून मंजुरी मिळाल्याची माहिती दिली, संपूर्ण मोरवाडी परिसरात टप्प्याटप्प्याने भूमिगत वीज केबल टाकून परिसर अधिक सुरक्षित केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. कापसे उद्यानाचे सुसज्ज नूतनीकरण करून ते विकसित व सुरक्षित पार्क म्हणून उभारण्याचा मानसही आमदार गोरखे यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाचे म्हणजे, मोरवाडीतील गंभीर ट्राफिकचा प्रश्न पहिल्यांदाच विधिमंडळात मांडणारे नेतृत्व म्हणून आपण ठोस पाठपुरावा करत असून, या सर्व प्रश्नांचा निश्चित निपटारा केला जाईल, असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी सभेत व्यक्त केला.
























Join Our Whatsapp Group